अंबाजोगाई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई उपरिवहन क्षेत्र कार्यालयात वाहनांचे अद्यायावत परीक्षण व निरीक्षण केंद्र ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे या केंद्रीय संस्थेच्या अधिपत्याखाली अंबाजोगाई येथे उभारण्यासाठी 8 कोटी 60 लाख रुपयांच्या आराखड्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
राज्यातील एकूण 13 परिवहन कार्यालयात या केंद्रांना मजुरी देण्यात आली असुन, या यादीत अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा समावेश आहे.
या केंद्राची इमारत उभारणी, वाहन परीक्षण करणारी अद्ययावत उपकरणे, फोर लेन रॅम्प, अशा विविध खर्चाच्या एकूण 8 कोटी 60 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.