November 28, 2021

कोरोनाचा आकडा 124 वर पोहचला !

कोरोनाचा आकडा 124 वर पोहचला !

बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2350 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 124 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2226 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 24 बीड 20 धारूर 6 गेवराई 10 केज 14 माजलगाव 4 परळी 1 पाटोदा 18 शिरूर 13 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात

मुंबईः महाराष्ट्रात काल ९ हजार ३६१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. गेल्या २४ तासांत ९ हजार १०१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही आकडेवारी जारी केली आहे. (coronavirus in maharashtra)
राज्यात काल करोनारुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ६० ते ७० हजारांच्या घरात पोहोचलेली रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. लसीकरण मोहिमेचा वेग, लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळं रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.
आज राज्यात ९ हजार १०१ रुग्णांनी करोनावर मात केली असून एकूण ५७ लाख १९ हजार ४५७ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५. ७६ टक्के इतका झाला आहे. तर, आज राज्यात ९ हजार ३६१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. करोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत असल्यानं दिलासा मिळतोय.

गेल्या २४ तासांत १९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर १. ९७ टक्के इतका झाला आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत १ लाख १७ हजार ९६१ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी अजूनही करोना मृतांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे.

राज्यात सध्या १ लाख ३२ हजार २४१ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध जिल्ह्यात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *