बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी 173 वर पोहचला .गेल्या काही दिवसांपासून कोरोना कमी होत असल्याचे चित्र आहे .मात्र बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा सात टक्यांच्या वरती असल्याने या आठवड्यात तरी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पाच दिवस सुरू राहतील .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 11,आष्टी 41,बीड 30,धारूर 12,गेवराई 13,केज 18,माजलगाव 11,परळी 4,पाटोदा 13,शिरूर 17 आणि वडवणी मध्ये 3 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्हा हा तिसऱ्या टप्यात असल्याने जिल्हाधिकारी जगताप यांनी बंधन शिथिल केली जाणार नाहीत,नागरिकांनी नियम पाळावेत अन्यथा पुन्हा लॉक डाऊन चा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे .