March 22, 2023

तुला प्रोटोकॉल कळतो का रे ! अजित दादांनी सीओ गुट्टे ला झापले !

तुला प्रोटोकॉल कळतो का रे ! अजित दादांनी सीओ गुट्टे ला झापले !

बीड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना चांगलेच झापले .तुला प्रोटोकॉल कळतो का रे,शहरात सगळी अस्वच्छता आहे,डिव्हायडर वर किती धूळ अन घाण,माती साचली आहे,तू करतो तरी काय,या शब्दात अजित दादांनी गुट्टे यांची खरडपट्टी काढली .

आपल्या स्पष्टवक्तेपणा मुळे परिचित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी बीडच्या दौऱ्यावर होते .जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या आल्याचं त्यांनी गाडीतून उतरताच नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला बोलवा म्हणत फर्मान सोडलं .

सीओ गुट्टे समोर येताच तुला प्रोटोकॉल कळत नाही का रे म्हणत शहरात किती अस्वच्छता आहे,काम करता की काय करता,मी येणार म्हणल्यावर बैठकीला हजर राहता येत नाही का?डिव्हायडर कधी साफ करता की नाही,दोन दिवसात स्वछता करा नाहीतर बघून घेतो अस म्हणत अजित पवार यांनी सीओ ना झापल .

काही दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांना सगळ्या लोकदेखत ‘गुप्ता हे काम काही बरोबर झालं नाही,काम छा छु झाल्याचं दिसतंय,सुधारणा करून घ्या,काम अर्धवट असताना मला बोलवत जाऊ नका’अशा भाषेत अजित पवार यांनी सुनावले होते .

बीड नगर पालिकेच्या गलथान कारभाराचा अनुभव आज खुद्द उपमुख्यमंत्री यांनाच आल्याने आता तरी नगर पालिका प्रशासन कामात सुधारणा करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click