बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट साडेसहा टक्यावर आला आहे .गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात आकडा वाढलेला दिसत असला तरी तपासणी केलेल्या रुग्णांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मर्यादित आहे .3424 रुग्णांची तपासणी केली असता 224 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 18,आष्टी 43,बीड 30,धारूर 08,गेवराई 28,केज 34,माजलगाव 06,परळी 20,पाटोदा 11,शिरूर 17 आणि वडवणी मध्ये 09 रुग्ण आढळून आले आहेत .
जिल्ह्यात गुरुवारी 224 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असले तरी तब्बल 3200 रुग्ण निगेटिव्ह आहेत तर 159 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे .दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला आहे .