बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे .सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात 154 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,मात्र मृत्युदर वाढत असून सोमवारी तब्बल दहा जण कोरोना मुळे मृत्युमुखी पडले आहेत .
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 09,आष्टी 59,बीड 14,धारूर 05,गेवराई 11,केज 22,माजलगाव 04,परळी 01,पाटोदा 02,शिरूर 20 आणि वडवणी मध्ये 07 रुग्ण आढळून आले आहेत .
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात सहा तालुक्यातील आकडे हे दहा च्या खाली असून मृत्यू होणाऱ्यांची संख्या मात्र वाढत आहे .सोमवारी तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे .