October 27, 2021

ऊर्जामंत्री आले अन गेले !ना कुणी पाहिले ना पुसले !!

ऊर्जामंत्री आले अन गेले !ना कुणी पाहिले ना पुसले !!

बीड – राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते,मात्र ते कधी आले ,कधी गेले हे काँग्रेसच्या मोजक्या चार दोन लोकांव्यतिरिक्त कोणालाच कळले नाही.त्यांच्या दौऱ्याची माहिती ना माहिती कार्यालयाने दिली ना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एवढंच काय ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या ऊर्जा विभागाने देखील याची खबर कोणाला दिली नाही .

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे .मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जितका बोलबाला आहे तितका काँग्रेस चा दिसत नाही .कारण प्रशासन असो की शासन कोणीच काँग्रेसच्या बाबतीत सिरीयस नसल्याचे चित्र आहे .

राष्ट्रवादी अथवा शिवसेनेचे मंत्री संत्री येणार असतील तर सगळं प्रशासन दिमतीला असतं, मोठा गाजावाजा केला जातो,बैठका अन दोऱ्याचा नियोजित अन सुव्यस्थित कार्यक्रम मीडिया पासून ते कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांना सांगितला जातो .

मात्र काँग्रेसचे मंत्री कधी येतात अन कधी जातात याची खबर कोणालाच मिळत नाही .राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे बीडला येऊन गेले,त्यांचा दौरा आहे हे त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या चार दोन डिजिटल वरून लक्षात आले .ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या ऊर्जा विभाग अर्थात महावितरण ,महा पारेषण विभागाने देखील बहुतेक त्यांचा दौरा गुप्त ठेवला .

ते ज्या पक्षाचे आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी देखील काही मोजके लोक (कार्यकर्ते नाही ) सोबत घेत त्यांचे अण्णाभाऊ साठे चौकात स्वागत केले .ना त्यांच्या स्वागताच्या कमानी लागल्या,ना कोणत्या वर्तमानपत्र अथवा इतर मीडियावर त्यांच्या स्वागताच्या जाहिराती दिसल्या,ते ज्या कार्यक्रमासाठी आले होते त्या कार्यक्रमाची जाहिरात देखील ऊर्जा विभाग अथवा काँग्रेस ने काढलीं नाही .

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचवत दिन दलित शोषित वंचित घटकांच्या उत्थानासाठी झटणाऱ्या डॉ राऊत यांच्या सारख्या अभ्यासू नेत्याच्या दौऱ्याची खबर मीडिया अथवा इतरांना न लागू देऊन जिल्हा काँग्रेस,प्रशासन,ऊर्जा विभाग यांनी नेमकं काय साधलं असा सवाल उपस्थित होत आहे .

आपल्या पक्षाच्या मंत्र्यांचा दौरा असल्यावर तरी दहा पाच रुपये खर्च करावे लागतात हे जिल्हा काँग्रेसला कीं शिकवणार असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे .शिवसेना अथवा राष्ट्रवादी चे मंत्री येणार असल्यावर टाईट असणारे ते ते विभाग अथवा जिल्हा प्रशासन देखील डॉ राऊत यांच्या दौऱ्याच्या वेळी ढिले होते हे दिसून आले .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *