बीड – राज्य शासनाने अनलॉक सुरू केल्यानंतर पाच टप्पे केले होते,त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश हा तिसऱ्या टप्यात असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार,रविवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत .त्यानुसार मेडिकल, किराणा,भाजीपाला श इतर अत्यावश्यक सेवा उद्या सुरू राहतील .
राज्य शासनाने पाच जून पासून अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली .मात्र त्यासाठी पाच टप्पे केले .यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड ची संख्या हे निकष लावले गेले .त्यामध्ये बीड तिसऱ्या टप्यात येत असल्याने सोमवार ते शुक्रवार पर्यंत सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते .

मेडिकल,किराणा,भाजीपाला,फळविक्रेते,स्वीट होम व इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सर्व दिवस सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते .त्यानुसार शनिवार दि 12 आणि रविवार दि 13 रोजी किराणा व भाजीपाला सह इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत .