बीड – रुजू झाल्यापासून कर्तव्यात कसूर केल्याच्या तक्रारी असलेले बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सूर्यकांत गित्ते यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांचा पदभार माजलगावचे डॉ सुरेश साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे .गित्ते यांची तडकाफडकी बदली झाल्याने चर्चा होत आहे .
बीडचे सीएस डॉ गित्ते हे काही महिन्यांपूर्वी बीडला रुजू झाले होते,डॉ अशोक थोरात यांच्या बदलीसाठी अनेकांनी प्रयत्न केले होते .त्यांचा पदभार मिळावा म्हणून गित्ते यांनी अनेक दिवसांपासून फिल्डिंग लावली होती .मात्र चार्ज घेतल्यानंतर गित्ते यांनी कामातून शिस्त आणि सुरळीतपणा दाखवला नाही .
त्यांच्या कारभाराबद्दल अनेक तक्रारी होत्या .कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गीते यांचा भोंगळ कारभार उघडा पडला.रेमडिसिव्हीर असो की रुग्णालयातील कारभार याबाबत गित्ते यांच्याविषयी अनेक तक्रारी होत्या .
अखेर त्यांची लोखंडी सावरगाव येथे बदली करण्यात आली असून माजलगाव चे डॉ सुरेश साबळे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे .