June 16, 2021

सिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्यास परवानगी !

सिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्यास परवानगी !

मुंबई (दि. 09) —- : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी या त्यांच्या मतदारसंघात दिलेल्या एका वचनाच्या पुर्तीच्या दिशेने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जमिनीवर एम आय डी सी उभारण्याच्या प्रस्तावास उद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांचे खाजगी सचिव उमेश वाघ यांनी ना. मुंडेंच्या कार्यालयास पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीवर औद्योगीक क्षेत्र – 2 अंतर्गत एम आय डी सी उभारण्याची मागणी ना. धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाला केली होती. विधानसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या अधिवेशनादरम्यान यासंदर्भात ना. देसाई यांच्याशी चर्चा करून एम आय डी सी प्रस्तावित करण्यात आली होती.

त्यानुसार यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीची उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करून राज्य शासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता व त्यानुसार जमीन संपादित करण्याची प्रक्रिया उद्योग विभागामार्फत सुरू होती. ना. धनंजय मुंडे स्वतः याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते.

दरम्यान उद्योग विभागाने मोठा निर्णय घेत, परळी तालुक्यातील सिरसाळा एम आय डी सी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने धनंजय मुंडे यांचे वचनपूर्तीकडे हे मोठे पाऊल मानले जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *