बीड – जिल्ह्यातील कोरोनाचा रिव्हर्स गियर जोरात सुरू असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ 132 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून तब्बल 2968 रुग्ण हे निगेटिव्ह आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 23,आष्टी 28,बीड 14,धारूर 05,गेवराई 04,केज 23,माजलगाव 10,परळी 01,पाटोदा 09,शिरूर 11 आणि वडवणी मध्ये 04 रुग्ण सापडले आहेत .
बीड जिल्ह्यात कोरोना कमी होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे,मात्र मार्केट ओपन झाल्याने विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची वाढती संख्या ही पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होण्यास कारणीभूत ठरू शकते हे नक्की .