बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी केवळ दिडशेच्या घरात राहिला .यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आष्टी तालुक्यातील आहेत .तर सर्वात कमी रुग्ण हे परळी आणि माजलगाव तालुक्यातील आहेत .
बीड जिल्ह्यातील 2845 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 155 पॉझिटिव्ह तर 2690 रुग्ण निगेटिव्ह आले आहेत .ज्यामध्ये अंबाजोगाई 18,आष्टी 35,बीड 20,धारूर 11,गेवराई 13,केज 21,माजलगाव 3,परळी 3,पाटोदा 5,शिरूर 19 आणि वडवणी मध्ये 7 रुग्ण आढळून आले आहेत .
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रशासनाने सोमवार पासून अन लॉक सुरू केले आहे,मात्र सोमवारी लोक ज्या प्रमाणात बाहेर पडले ते पाहता कमी होत असलेली ही संख्या वाढू शकते हे निश्चित .