बीड – गेल्या आठ दहा दिवसापासून कमी होत असलेल्या कोरोनाच्या आकड्याने रविवारी दोनशेपेक्षा कमी स्कोर केल्याने बीड करांना मोठा दिलासा मिळाला .जिल्ह्यातील 3755 रुग्णांची तपासणी केली असता 182 पॉझिटिव्ह आले असून 3574 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 11,आष्टी 38,बीड 30,धारूर 10 ,गेवराई 16,केज 29,माजलगाव 12,परळी 1,पाटोदा 8,शिरूर 10 आणि वडवणी मध्ये 16 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्या कमी होत असल्याने सोमवार पासून सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे .मात्र नागरिकांनी गर्दी न करता काळजी घेणे आवश्यक आहे .