बीड – जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना मोर्चा काढून या कायद्याचे तसेच जमावबंदी आणि संचारबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी आ विनायक मेटे यांच्यासह 21 मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
बीड येथे मराठा आरक्षणाच्या विषयावरून आ विनायक मेटे,नरेंद्र पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला .जिल्ह्यात सध्या जमावबंदी आणि संचारबंदी लागू आहे .तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे .
मोर्चाला कोणतीही परवानगी नसताना आ मेटे आणि इतरांनी परवानगी झुगारून मोर्चा काढत कायद्याचे उल्लंघन केले .या प्रकरणी मंडळ अधिकारी अतुल झेंड यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिसात आ मेटे,नरेंद्र पाटील,राजेंद्र घाग,रमेश पोकळे,स्वप्निल गलधर, अनिल घुमरे युवराज मस्के,मनोज जरांगे यांच्यासह 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .