बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शुक्रवारी 265 इतका आला .3414 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 3149 निगेटिव्ह आले आहेत .जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह च्या संख्येत घट होत असली तरी नागरिकांनी आणखी काही दिवस काळजी घेण्याची गरज आहे .
बीड जिल्ह्यातील बीड 57,केज 33,परळी 05,शिरूर 29,अंबाजोगाई 14,गेवराई 31,वडवणी 16,माजलगाव 19,पाटोदा 15,धारूर 15 आणि आष्टीमध्ये 31 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील कोरोना चा वेग हळूहळू कमी होत असल्याचे चित्र आहे,मात्र आणखी काही दिवस धोक्याचे असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे .