बीड – बीड येथे मराठा आरक्षणाच्या विषयावर आयोजित केलेला मोर्चाला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ नरेंद्र पाटील आणि आ विनायक मेटे यांनी केले .बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच असा निर्धार यावेळी आ मेटे यांनी केला .
स्व.आण्णासाहेब पाटील यांनी 1982 मध्ये पाहीलेले व त्यासाठी दिलेले बलीदान दिलेले आरक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी 05 जुन रोजी आयोजित मराठा क्रांती संघर्ष मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे अवाहन नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी बीड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, मुंबई येथुन पहिल्यांदा स्व.आण्णासाहेब पाटील यांनी 1982 मध्ये पहिला मराठा आरक्षणाचा मोर्चा काढला होता. तेव्हापासून आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी आपला सर्वांचा लढा सुरुच होता. दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावनीत आपण हा लढा हारलो, यासाठी आघाडी सरकारचा निष्क्रीय कारभार पुर्णपणे कारणीभूत होता. आताही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन नुसार आपल्याला पुन्हा एकदा आरक्षणाचा हा लढा उभा करावा लागत आहे.
त्यासाठी आ.विनायकराव मेटे यांनी बीड मधुन याचं रणशिंग फुंकलं असून, जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी या आरक्षण लढ्यात आपली उपस्थिती लावावी. आता नाही, पुन्हा कधीच नाही… असा हा मोर्चा असुन, या मोर्चाच लोन संपुर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. परिणामी राज्य सरकारवर मोठा दबाव तयार होणार असून, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या गाईडलाईन नुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये संपुर्ण सवलत व इतर काही सोयी-सुविधा मिळविण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. तरी समाज बांधवांनी या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहनही पाटील यांनी केले आहे.