बीड – बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3310जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 322 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2988 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 16 आष्टी 60 बीड 74 धारूर 28 गेवराई 33, केज 25 माजलगाव 22 परळी 4 पाटोदा 17, शिरूर 28 वडवणी 15 असे रुग्ण आढळून आले आहेत.
बुधवारी राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,७६,१८४ झाली आहे. आज २९,२७० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,१६,०१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यात बुधवार २८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २८५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २६८ ने वाढली आहे
बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मंगळवारी (१ जून २०२१) १ लाख ३२ हजार ७८८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ३२०७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ३१ हजार ४५६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८३ लाख ०७ हजार ८३२ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ६१ लाख ७९ हजार ०८५ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या १७ लाख ९३ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ३५ हजार १०२ वर पोहचलीय.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ८३ लाख ०७ हजार ८३२
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ६१ लाख ७९ हजार ०८५
उपचार सुरू : १७ लाख ९३ हजार ६४५
एकूण मृत्यू : ३ लाख ३५ हजार १०२