बीड – बीड जिल्ह्यात लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे चित्र आहे .ज्या दुकानांना सकाळी सात ते अकरा या वेळेत दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे त्याशिवाय इतर दुकाने देखील सुरू असल्याचे चित्र आहे.अशा पद्धतीने नागरिकांनी गर्दी केल्यास पुन्हा कडक लॉक डाऊन केला जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे .
बीड जिल्ह्यात 1 जून पासून लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल केला आहे,त्यामुळे लोक रस्त्यावर विनाकारण फिरून गर्दी करत आहेत असे दिसून येत आहे .मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असल्याने पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका आहे .
ज्या दुकानांना परवानगी दिली आहे त्याशिवाय इतर दुकाने देखील सुरू असल्याचे दोन दिवसात दिसून आले आहे .व्यापारी वर्गाने याबाबत प्रशासनाला सहकार्य करावे तसेच नागरिकांनी देखील काळजी घ्यावी अन्यथा पुन्हा कडक लॉक डाऊन केला जाईल असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे .