नवी दिल्ली – राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती,दरम्यान केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता सीआयएससीई नेसुद्धा 12 बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. देशातील सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता हा निर्णय घेण्याता आला. या निर्णयानंतर आता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर काम केले जाणार आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे अशा बिकट परिस्थितीत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे जिकरीचे ठरु शकते, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात होते.
परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी अनेक विद्यार्थी तसेच पालक करत होते. याच पार्श्वभूमीवर आज (1 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या निर्णयानंतर आता सीआयएस्सीइ ने सुद्धा 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.