बीड – बीड जिल्हा वासीयांसाठी मंगळवारी दिलासा दायक आकडेवारी समोर आली .मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवलं 361 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट दहा टक्यांच्या आत आला असून सर्वाधिक रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .
बीड जिल्ह्यातील 3791 रुग्णांची तपासणी केली असता अंबाजोगाई 30,धारूर 17,आष्टी 60,बीड 70,गेवराई 24,केज 44,माजलगाव 29,परळी 12,पाटोदा 29,शिरूर 28 आणि वडवणी मध्ये 18 रुग्ण सापडले आहेत .
बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे .पंधरा दिवसापासून कोरोनाने रिव्हर्स गियर टाकला असून बीड वासीयांनी थोडी काळजी घेतली तर हा आलेख आणखी कमी होईल यात शंका नाही .