मुंबई – राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील आदेश राज्य सरकरने जारी केला आहे.दरम्यान या निर्णयानंतर आ विनायक मेटे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही अस म्हणत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असा दावा त्यांनी केला आहे .
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता तसा निर्णय सरकारने घेतला होता. आता मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा निर्णय सरकारने दिला आहे.
शिवसंग्राम चे आ विनायक मेटे यांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे,आपण आरक्षण रद्द झाल्याच्या दिवसापासून मराठा समाजाचा समावेश ई डब्ल्यू एस मध्ये करावा अशी मागणी करत होतो,सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली .त्यानंतर सरकारला जाग आली,उद्धव ठाकरे यांच्या सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही अस म्हणत मेटे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे .
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाजातील काही संघटनांकडून ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला द्यावं अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करुन राज्य सरकारनं मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात आणि नोकरीमध्ये ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षणाचा लाभ मराठा युवकांना मिळणार आहे. राज्य सरकारने याबद्दलचा आदेश आज काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचं म्हटलं जात आहे.