बीड – गेल्या दहा बारा दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा जिल्ह्यात कमी होत असल्याचे चित्र आहे .सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात 516 पॉझिटिव्ह तर 3684 निगेटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील 4200 रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते .अंबाजोगाई 18,आष्टी 57,बीड 218,धारूर 14,गेवराई 49,केज 22,माजलगाव 26,परळी 6,पाटोदा 58,शिरूर 26 आणि वडवणी मध्ये 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असला तरी बीड तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे .बीड जिल्ह्यातील लॉक डाऊन शिथिल होणार की वाढणार हे आज सायंकाळी स्पष्ट होईल,मात्र रुग्णसंख्या लक्षात घेता लॉक डाऊन शिथिल होण्याची शक्यता कमीच आहे .