बीड – एकीकडे खून करणाऱ्या आरोपीला सोडून देणारे शिरूरचे पोलीस तर दुसरीकडे बेपत्ता असलेल्या मुलीच्या बापाला चाळीस हजार रुपयांची मागणी करणारे दिंद्रुड चे पोलीस आणि हे सगळं गप्प बसून उघड्या डोळ्यांनी पाहणारे पोलीस अधीक्षक यामुळे बीड पोलीस दलाची अब्रू पार वेशीला टांगली गेली आहे .
बीड पोलीस दलात नेमकं चाललंय काय हेच कळायला मार्ग नाही .कोणत्याच पोलीस अधिकाऱ्यांवर एसपी चा वचक नसल्याचे दिसत आहे .बीड ग्रामीण पोलीस दलातील बडे नामक एक अधिकारी त्याच्या ठाण्याच्या आवारात अवैध इमारत उभी करतो तर पेठ बीड चे पाटील गुटख्याचा धंदा करणाऱ्या मुळे नामक व्यक्तीला पाठीशी घालतात,हे सगळं माहीत असूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता एस पी शांत बसतात .
एका सराफा व्यापऱ्याचा खून करणारा आरोपी संशयित म्हणून ठाण्यात आणला जातो अन पाच तासानंतर त्याला मोकाट सोडून दिलं जात .तरीही एसपी शांतच .हे कमी म्हणून की काय दिं द्रुड चे गव्हाणकर नावाचे पोलीस अधिकारी बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध लावण्यासाठी तिच्या मजबूर आई बापाला चाळीस हजाराची मागणी करतात .
या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मुजोरीचे अनेक पुरावे उपलब्ध असून सुद्धा एसपी त्यांच्यावर कारवाई न करता एवढी मेहरबानी का करतात हे न उलगडणारे कोडे आहे .एसपी ना नेमकं कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवून जनतेची लूट करणारे अधिकारी आवडतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे .