September 27, 2021

आठ दिवसात पंधरा रुग्णवाहिका ! धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाला यश !!

आठ दिवसात पंधरा रुग्णवाहिका ! धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाला यश !!

बीड – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यासाठी आठ दिवसात पंधरा रुग्णवाहिका बीड करांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत .कोरोनाच्या संकट काळात मुंडे सातत्याने बीड जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत,मागील आठवड्यात जिल्हा रुग्णालयासह इतर ठिकाणी आठ रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या ,शनिवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला आणखी 7 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत .

मागील आहवड्यातच जिल्हा आरोग्य यंत्रणेला ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांसाठी 8 नव्या रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्या, त्यानंतर आज जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यासाठी आणखी 7 नव्या रुग्णवाहिका प्राप्त झाल्यामुळे रुग्ण वाहतुकीतील मोठा अडथळा आता दूर होणार आहे.

ऑक्सिजन सह सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या या 7 रुग्णवाहिका आज जिल्ह्यात दाखल झाल्या असून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट, उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती श्री. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

परळी तालुक्यातील धर्मापुरी, धारूर तालुक्यातील रुई धारूर व मोहखेड, बीड तालुक्यातील चऱ्हाटा, आष्टी तालुक्यातील कडा, शिरूर कासार व वडवणी या सात आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे या सात रुग्णवाहिका वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी दिली आहे.

पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार राज्य आरोग्य विभागाकडे बीड जिल्ह्यासाठी एकूण 52 रूग्णवाहिकांची मागणी करण्यात आलेली आहे, त्यापैकी पहिल्याच टप्प्यात 15 रुग्णवाहिका प्राप्त झाल्याने रुग्णवाहतुक करण्यात येणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होतील, असा विश्वासही डॉ. पवार यांनी व्यक्त केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजित पवार यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्यासाठी आवश्यक त्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत शब्द दिला होता. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यासाठी मागितलेल्या रुग्णवाहिकांपैकी या टप्प्यात आतापर्यंत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसाठी 8 व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी 7 अशा एकूण 15 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या असुन याबद्दल अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांचे जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *