मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी प्रचंड वाढली असून त्यांच्यावरील नाराजीमुळेच आपल्याला राजकारणात यावे लागले अस स्पष्ट करत माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय यांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले .धनंजय हे केवळ परळी पुरते मर्यादित पालकमंत्री असल्याचा आरोप पंकजा यांनी केला .
लोकसत्ता दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पंकजा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापासून ते परळीत झालेल्या पराभवाबद्दल आपलं मत व्यक्त केलं .
आपल्याला राजकारणात यायचं नव्हतं पण धनंजय यांच्याबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी होती त्यामुळे ते निवडून येऊ शकणार नाहीत अस बोललं जातं होत,म्हणून आपण राजकारणात आलो अस सांगत आपला पराभव का झाला हे अजूनही न उलगडलेले कोडं आहे अस पंकजा म्हणाल्या .
धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी वाढली आहे,वाळू माफियांनी डोके वर काढले आहे,आपल्या काळात दाबून ठेवलेले गुंड लोक आज बिनधास्त वावरत आहेत .सिव्हिल सर्जन चा विषय असो की पोलीस अधिकाऱ्यांचा पालकमंत्री यांच्यावर लोक नाराज आहेत .अस सांगत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धती वर टीका केली .
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कसरत सुरू आहे अस सांगताना नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून यशस्वी काम करत असल्याचं त्यांनी सांगितले .
पंकजा आणि धनंजय मुंडे या बहीण भावातील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे,अशात आता पंकजा यांनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याच आहे .