बीड – बीड जिल्हा रुग्णालयात वाढते कोरोना रुग्ण आणि कमी असलेली उपकरणे आणि यंत्रसामुग्री याबाबत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी करत अत्यावश्यक सामुग्री देण्याचा आग्रह धरला .ऑक्सिजन कोन्स्ट्रेटर सह इतर साहित्य तातडीने देण्याबाबत त्यांनी केलेल्या मागणीला दोघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे .
बीड जिल्हा रूग्णालयात कोविड-१९ व व्हाईट फंगस या आजारावर उपचारासाठी वैद्यकीय उपकरणांची व कर्मचारी वर्गाची नितांत आवश्यकता असून त्याची पूर्तता त्वरित करावी अशी आग्रही मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
बीड जिल्ह्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपकरणाची आणि कर्मचारी वर्गाची नितांत गरज आहे,कोविड-१९ बाधित रूग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्र सामुग्री रुग्णालयात आवश्यक आहे जिल्हा रुग्णालयासाठी
१. बायपॅप व्हेंटिलेटर मशिन-५०
२. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिन-५०
• म्युकरमायकोसिस बाधित रूग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने शस्त्रक्रियागृहात आवश्यक यंत्र सामुग्री .
१. Functional Endoscopic sinus surgery Unit with debrider-१
२. Bipolar / Monopolar wet field quatery -१
कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने बाधित बालकांवर उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्र सामुग्री .
१. पेडियाट्रिक व्हेंटिलेटर – ३
२. पेडियाट्रिक सक्शन मशिन-३
३ पेडियाट्रिक बेड – ३०
सीझोफेर्नीया या मनोविकारावरील औषधी उपलब्ध असणे गरजेचे असून रूग्णालयामध्ये एकही ENT सर्जन नाही, एक ENT सर्जनची नियुक्ती अत्यावश्यक असून कृपया सत्वर निर्णय घ्यावा अशी विनंती माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे