बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा गेल्या काही दिवसापासून कमी होत असल्याचे चित्र आहे .गेल्या दोन अडीच महिन्यात तीस ते पस्तीस टक्यावर गेलेला रुग्णसंख्येचा आकडा आता दहा बारा टक्यात आला आहे .शुक्रवारी साडेसहा हजार रुग्णांची तपासणी केली असता केवळ 700 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील 6669 रुग्णांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला यामध्ये 700 रुग्ण पॉझिटिव्ह तर 5969 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत .गेल्या दोन अडीच महिन्यात वाढलेली रुग्णसंख्या यामुळे बीडकर चिंताग्रस्त झाले होते,मात्र तीन चार दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने बीड वासीयांना दिलासा मिळाला आहे .
शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात बीड 251,अंबाजोगाई 39,आष्टी 56,धारूर 21,गेवराई 83,केज 64,माजलगाव 46,परळी 14,पाटोदा 48,शिरूर 55,वडवणी 23 रुग्ण सापडले आहेत .
बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी काही दिवस आणखी काळजी घेणे आवश्यक आहे .