June 17, 2021

लॉक डाऊन वाढणार – टोपे !

लॉक डाऊन वाढणार – टोपे !

मुंबई – महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्रातील लॉकडाउन या विषयावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्यानं सरकार अजूनही सावध भूमिकेत आहे. त्यामुळे लॉकडाउन उठवला जाणार की, कायम ठेवला जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील लॉकडाउनसंदर्भातील चित्र स्पष्ट झालं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर महाराष्ट्रातील चित्र कसं असेल, याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील लॉकडाउन १ जूननंतरही कायम राहणार आहे. मात्र, काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौते वादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *