बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असून 5588 रुग्णांची तपासणी केली असता त्यात केवळ 603 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 4985 निगेटिव्ह आढळून आले आहेत .बीड तालुक्याचा आकडा देखील दोनशे च्या आत आला आहे .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 55,आष्टी 79,बीड 165,धारूर 30,गेवराई 58,केज 65,माजलगाव 50,परळी 12,पाटोदा 26,शिरूर 49 आणि वडवणी मध्ये 14 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊ लागला असून बीड वासीयांना गुरुवारी सुखद धक्का बसला कारण बीड तालुक्याचा आकडा दोनशेच्या आत आला आहे .