बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे .बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात साडेपाच हजार रुग्णांची तपासणी केली असता त्यात 703 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 4798 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत .या अहवालात बीडचे रुग्ण सर्वाधिक असून तब्बल 226 रुग्ण बीड तालुक्यात सापडले आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 42,आष्टी 92,बीड 226,धारूर 25,गेवराई 66,केज 64,माजलगाव 30,परळी 15,पाटोदा 46,शिरूर 63 आणि वडवणी मध्ये 33 रुग्ण सापडले आहेत .
बीड तालुक्यातील रुग्णसंख्येचा वाढत असलेला वेग हा चिंता करायला लावणारा आहे .जिल्ह्यातील इतर तालुक्यांची रुग्णसंख्या कमी होत असताना बीड मात्र रोज दोनशे अडीचशे च्या घरात रुग्ण सापडत आहेत .विशेष बाब म्हणजे बीडच्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ही लक्षणीय आहे .