November 26, 2022

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर पोलिसांनी सोडून दिले !

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर पोलिसांनी सोडून दिले !

शिरूर कासार – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर कासार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिनबोभाटपणे सोडून देत पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांच्यासहित पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली आहे .विशाल कुलथे हा सराफा चा व्यापारी बेपत्ता झाल्यानंतर तो सगळ्यात शेवटी गायकवाड नावाच्या मित्रा सोबत अनेकांनी पाहिला होता मात्र शिरूर चे पोलीस निरीक्षक माने यांनी या आरोपीला केवळ चौकशीसाठी बोलावून त्याच्या गोड गोड गप्पांना भुलत त्याला सोडून दिले आणि आता अख्ख्या जिल्ह्यातील पोलीस या आरोपीच्या शोधासाठी रात्रंदिवस भटकत आहेत आपली जबाबदारी न पाहता अत्यंत हलगर्जीपणा करत कर्तव्यात कसूर करणाऱ्या माने सारख्या अधिकाऱ्यांना एस पी का पाठीशी घालत आहेत हे मात्र न उलगडणारे कोडे आहे

शिरूर कासार शहरातील सराफा व्यापारी विशाल कुलथे याचा दोन दिवसापूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघड केले पोलिसांच्या तपासात विशालच्या मित्रांनी त्याचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले हा सगळा प्रकार अत्यंत भयानक असा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले

विशाल कुलथे हा बेपत्ता होण्याच्या अगोदर त्याचा मित्र ज्ञानेश्वर गायकवाड याच्यासोबत दुचाकीवरून जाताना अनेकांनी पाहिले होते दोन दिवस विशाल बेपत्ता आहे म्हटल्यानंतर जागे झालेल्या शिरूर पोलिसांनी चौकशीसाठी त्याच्या काही मित्रांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले त्यामध्ये ज्ञानेश्वर गायकवाड याचा देखील समावेश होता

बीडचे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी हे टोल देऊन बीडला आल्याची चर्चा आहे,त्यामुळे गुन्हे उघडकीस आणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यापेक्षा” जो देता वो नेता भाड मे जाये जनता”अशा पध्दतीने त्यांचा कारभार सुरू आहे.त्यामुळेच बेकायदेशीर बांधकाम करणारे सुजित बडे असोत की गुटखा माफिया मुळे आबाला अभय देणारे पेठ बीड चे विश्वास पाटील असोत अथवा आता चक्क मुख्य आरोपिलाच सोडून देणारे सिद्धार्थ माने असोत,अशा कामचुकार अन हप्तेखोर अधिकाऱ्यांना रामस्वामी पाठीशी घालत आहेत .कारण गुन्हे आणि चूका माफ करायच्या असतील तर एसपी ना वाटा द्यावा लागतो अन तो गोळा करण्यावर यांचा सध्या जोर आहे,त्यामुळे भ्रष्ट अन कामचुकार बडे,पाटील,माने सारखे अधिकारी अजूनही त्या त्या ठिकाणची सुभेदारी बिनबोभाट करीत आहेत .

ज्ञानेश्वर याची पाच तास चौकशी केल्याचे दाखवत त्याच्या भूलथापांना बळी पडत पोलीस निरीक्षक माने पवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याला सोडून दिले वास्तविक पाहता संशयित आरोपी म्हणून गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्याला चौकशीसाठी थांबवून ठेवले असते तर काही फरक पडला नसता

एकीकडे सिद्धार्थ माने यांनी गायकवाड हा आरोपी नसून भलताच आरोपी असल्याचे सिद्ध करण्याचा चंग बांधला आणि दुसरीकडे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी काही तासातच गायकवाड याच्या भातकुडगाव या शेतातून विशाल तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि सिद्धार्थ माने यांनी किती मोठी चूक केली हे उघड झाले

एखाद्या संशयित आरोपीला चौकशीसाठी ठाण्यात बोलावून पुन्हा सोडून दिल्यानंतर अशा माने सारख्या अधिकाऱ्यावर आणि आष्टी येथे बसून उंटावरून शेळ्या हाकणे नाऱ्या पोलीस उपाधीक्षक लगारे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांवर पोलिस अधीक्षकांनी कारवाई करणे अपेक्षित असताना रामस्वामी मात्र रिकामे उद्योग करण्यातच बिझी आहेत

एकीकडे एक पोलीस निरीक्षक संशयित आणि मुख्य अशा आरोपीला सोडून देतो आणि दुसरीकडे जिल्ह्यातील पोलीस दल त्या आरोपीच्या शोधासाठी महाराष्ट्रभर फिरत राहतो मग आरोपीला सोडून देणाऱ्या पोलीस निरीक्षक आवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि अख्ख्या पोलीस दलाची इभ्रत वेशीवर तांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर पोलीस अधीक्षक काही कारवाई करणार आहेत का हाच खरा प्रश्न आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click