September 20, 2021

मराठा समाजाला ई डब्ल्यू एस आरक्षण लागू करण्यासाठी कोर्टात याचिका !

मराठा समाजाला ई डब्ल्यू एस आरक्षण लागू करण्यासाठी कोर्टात याचिका !

औरंगाबाद – मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजात तीव्र असंतोष असून बीड मध्ये या विरोधात 5 जून ला मोर्चा काढण्यात येणार आहे,तसेच आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे आ विनायक मेटे यांनी मराठा समाजाला केंद्र सरकारने लागू केलेल्या ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांविरोधात दाखल केली आहे.

याबाबत माहिती देताना आ मेटे म्हणाले की,आरक्षण रद्द झाल्यानंतर आम्ही राज्य सरकारकडे मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. ज्यांना कोणतेही आरक्षण मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी कोणत्याही समाजाच्या लोकांसाठी 10 टक्के आरक्षण दिले आहे. यामध्ये मराठा समाजाला घेण्याची मागणी केली होती. मात्र, आता 15-20 दिवस झाले यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. यामुळे नाकर्तेपणाच्या विरोधात मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याचे मेटे म्हणाले.

आता नोकऱ्या,ऍडमिशन सुरु होत आहेत. यामुळे लवकरात लवकर यासंबंधी विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि राज्याचे सचिव यांना नोटिसा काढाव्यात असे या याचिकेत म्हटल्याचे मेटे म्हणाले. मराठा आरक्षण रद्द विरोधी बीडमध्ये 5 जूनला मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा काढण्यात येईल असेही मेटे यांनी स्पष्ट केले .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *