बीड – महाराष्ट्र बुद्धिबळ संघटने तर्फे घेण्यात आलेल्या बुद्धिबळ पंच प्रशिक्षण बॅच 4 ( B-2 ) चे उद्द्घाटन आज तारीख 23 मे 2021रोजी सकाळी सकाळी 8.45 वाजता ऑनलाईन पद्धतीने पुणे येथे झाले. यावेळी शेंडगे,राजेश कुलकर्णी आणि प्रवीण रसाळ यांची बीड जिल्हा पंच म्हणून निवड करण्यात आली .
उद्धघाटन समयी, मा.नरेंद्र फिरोदिया उपाध्यक्ष एमसीए आणि चेअरमन युनिकॉर्प. नरेश शर्मा खजिनदार AICF. IA विपनेश भारद्वाज,उपाध्यक्ष AICF.श्री. राहुल शाह,फिलिप कॅपिटल pvt LTD , India head. श्री फारुख शेख , खजिनदार एमसीए. तसेच एमसीए चे अध्यक्ष श्री सिद्धार्थ मयुर. AICF सिलेक्शन कमेटी चेअरमन व एमसीए उपाध्यक्ष GM अभिजित कुंटे.तसेच एमसीए उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र बुद्धिबळ चेस इन स्कूल कमिशनर
श्री गिरीश चितळे. एमसीए सचिव निरंजन गोडबोले यांच्या उपस्थित झाले.
एमसीए अध्यक्ष श्री मयुर यांनी मान्यवरांचे स्वागत केले व प्रस्तावना केली. एमसीए ने हाती घेतलेल्या उपक्रमाची संपूर्ण माहिती दिली. श्री गिरीश चितळे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले व प्रशिक्षणार्थी ना शुभेच्छा दिल्या. मा. नरेश शर्मा यांनी सांगितले की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्याचे पूर्ण ज्ञान तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही त्या क्षेत्राला न्याय देवु शकतो तसेच बुद्धिबळ पंचा ची भूमिका ही नेहमी त्रयस्थ असली पाहिजे व निर्णय ही योग्याच ,बरोबर दिले पाहिजेत तसेच वर्तणूक चांगली असली पाहिजे तसेच आपला पोशाख सुद्धा चागला असला पाहिजे या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात. तसेच त्यांनी एमसीए म्हणजे तुम्ही व तुम्ही म्हणजे एमसीए असे समीकरण आहे म्हणून एमसीए प्रगतीपथावर आहे असे आवर्जून सांगितले. सर्व प्रशिक्षणार्थी चे कौतुक केले.IA विपनेश भारद्वाज यांनी सुरवातीलाच सांगितले की माझे नाते महाराष्ट्राशी खूप जुने आहे.
बुद्धिबळ पंचांची ची नियमा मध्ये पूर्ण सूस्पष्टता हवी व घेतलेल्या निर्णयामध्ये आत्मविश्वास हवा .मेहनत घेण्याची तयारी हवी. स्पर्धा हॉल पासून स्पर्धा पूर्ण होईपर्यंत जबाबदार व्यक्ती म्हणून काम करणे जरुरीचे आहे.मदतीसाठी तत्पर तयार असायला हवे, पंच हा संघटक स्पर्धक यांच्यातील महत्वपूर्ण दुवा असतो त्यानी त्यांच्या गोवा स्पर्धेचा अनुभव सांगितला.
त्यांनी त्यांचा मुलगा U-11 राष्ट्रीय स्पर्धा खेळत असताना 9 व्यां फिरीचा किस्सा सांगितला.पंचांनी स्पर्धेत मुले खेळताना तो कोणाचा आहे हे न पाहता योग्य निर्णय देणे गरजेचे आहे असे सांगितले. तर पुस्तकी ज्ञाना बरोबर समयसूचकता, व खंबीर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. या प्रशिक्षासाठी फिडे पंच प्रवीण ठाकरे, व पाहुणे म्हणून मार्गदर्शन फिडे पंच अजिंक्य पिंगळे व IA संदेश नगरनाईक यानी केले.एमसीए खजिनदार श्री फारुख शेख यांनी पंच याचे वेगळे अस्तित्व असावे असे सूचित केले, तर उतरत्या काळात त्यांना पेन्शन असावे व त्याचा विचार केला जावा असे सूतोवाच केले.
मा.फिरोदिया यांनी AICF ने एमसीए ला दिलेल्या सहकर्या बद्दल धन्यवाद दिले. सचिव गोडबोले यांनी सर्वांचे आभार मानले.व कार्यक्रमाची सांगता केली.सदरील प्रशिक्षण वर्गास
बीड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे शेंडगे
व राजेश कुलकर्णी तसेच प्रवीण रसाळ उपस्थित होते या तिघांची बुद्धिबळ पंच म्हणून यावेळी निवड करण्यात आली