बीड – मराठा आरक्षणावरून राज्यात समाजात असंतोष आहे, बीडमध्ये आ विनायक मेटे यांनी 5 जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे,मात्र बीडमध्येच अनेक युवक आणि संघटनांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे . अगोदर कोरोनाचा मुकाबला करू आणि मग आरक्षणाची लढाई करू असे मत सचिन उबाळे यांच्यासह अनेकांनी व्यक्त केले आहे .
सर्वोच्या न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. त्यामुळे विविध संघटना, पक्ष आं दोलन मोर्चे काढण्याच्या तयारीत आहेत. परंतु ही वेळ मोर्चा, आंदोलने करण्याची नाही. कारण कोरोना सारखे महाभयंकर संकट देशावर कोसळलेले आहे. त्यामुळे आगोदर या कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकूया व नंतर मराठा आरक्षणाची लढाई जिंकूया असे आवाहन स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रा.सचिन उबाळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरीही हा लढा संपलेला नाही. परंतु आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची ही वेळ नाही. काही नेते मंडळी वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलन, मोर्चे करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे गर्दी होईल. कोरोनाचा प्रसार होईल. मोर्चा, आंदोलन करुन मराठा बांधवांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे आगोदर कोरोना महामारीची लढाई जिंकुया त्यानंतर मराठा आरक्षणाची लढाई जिंकुया असे आवाहन स्वभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वक प्रा.सचिन उबाळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.