June 17, 2021

सात दिवसात 22 रुग्ण पळाले !

सात दिवसात 22 रुग्ण पळाले !

शिरूर कासार – सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या कोविड केयर सेंटर मधून सात दिवसात 22 बाधित रुग्णांनी पळ काढून इतरांना या आजराचा प्रसाद दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .सात दिवसात एक दोन करून पळून जाणाऱ्या या लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे,मात्र या प्रकरणी हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित यंत्रणेवर कोणतीच कारवाई झाली नाही हे विशेष .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका पातळीवर शासकीय वसतिगृह तसेच इतर ठिकाणी कोविड केयर सेंटर सुरू केले आहेत .शिरूरच्या शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर आहे .सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांना या ठिकाणी ठेवून उपचार केले जातात .

14 ते 21 मे या सात दिवसात या सेंटर मधून तब्बल 22 बाधित रुग्णांनी पळ काढल्याचे समोर आले आहे .शिरूर,बावी,आनंदगाव, घोगस पारगाव,पौंडुल,जांब,मानूर,हिवरसिंगा,झापवाडी, दगडवाडी, नारायनवाडी या गावातील हे रुग्ण आहेत ज्यांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला .

तब्बल सात दिवस एक एक दोन दोन रुग्ण गायब होत असताना आरोग्य विभागाची यंत्रणा झोपा काढत होती की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या डॉक्टर आणि स्टाफ वर या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे ते कशा पद्धतीने आपली कर्तव्य पार पाडतात हे यावरून स्पष्ट झाले आहे .

या प्रकरणी पळ काढणाऱ्या रुग्णांवर गुन्हा दाखल झाला आहे मात्र निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *