माजलगाव – शॉर्टसर्किट मुळे घराला आग लागून त्यात मायलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे पहाटे घडली .या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे .
शशिकला शंकरराव फफाळ वय 65 व सखुबाई शंकरराव फफाळ वय 45 अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. शशिकला आणि सखुबाई या मायलेकी घरात झोपल्या होत्या. या दरम्यान अचानक शॉर्टसर्किटने घराला आग लागली आणि या दोघींचाही होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.तर घराला नेमकी कशामुळे लागली? याचा तपास माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी करत असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.