बीड – जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा शनिवारी देखील आठशे च्या आत आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे .जिल्ह्यातील 5520 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 4731 निगेटिव्ह तर 789 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .जिल्ह्यातील तीन तालुक्यातील रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 69,आष्टी 69,बीड 195,धारूर 47,गेवराई 103,केज 75,माजलगाव42,परळी 57,पाटोदा 53,शिरूर 57,वडवणी 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून बाधित रुग्ण कमी होत असल्याचे चित्र दिसूनयेत आहे .मात्र ज्या प्रमाणात पॉझिटिव्ह केसेस कमी व्हायला पाहिजेत तो वेग नसल्याचे स्पष्ट आहे .जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापही पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे .