September 27, 2021

कोरोना काळात चंपावती प्रतिष्ठानचा आधार !

कोरोना काळात चंपावती प्रतिष्ठानचा आधार !

बीड-गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने अनेकांना अडचणीत गाठले आहे,कोरोना झाल्यावर अनेक कुटुंबांना घरगुती सामान आणि दोन वेळचे जेवण मिळणे अवघड होऊन बसते आशा संकटात बीडच्या चंपावती प्रतिष्ठानने मदतीचा हात पुढे आहे कोरोना ग्रस्तांच्या नातेवाईकांना पौष्टीक दोन वेळचे जेवण घरपोच देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे बीडचा युवा तरुण धनंजय वाघमारे त्यांचे दोन्ही भाऊ डॉ धनराज वाघमारे ,धनदीप वाघमारे व त्याची सर्व मित्र परिवार दररोज ही सेवा देत असल्याने अनेक रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळत आहे.
चंपावती प्रतिष्ठाणने मागील लॉकडाउन मध्ये हजारो लोकांना किराणा सामान किट वाटप करत गरजूंना आधार देण्याचे काम केले होते त्या नंतर यावर्षीही कोरोना ची दुसरी लाट आली आसून या संकटाचा काळात धनंजय वाघमारे हे मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून तेच काम ह्या लॉकडाउन मध्ये सुद्धा सुरुच ठेवले आहे.


कोरोना काळात रक्ताचे नातेवाईक जवळ येत नव्हते या कठीण प्रसंगी धनंजय वाघमारे हा त्यांना दोन वेळेचे मोफत व पौष्टीक जेवण त्यांना घरी नेहून देत त्यांना धीर देऊन काय कमी ज्यास्त पाहत आहे कोरोना पोझीटीव्ह जे रुग्ण आहेत त्यांच्या घरी वेळेत दोन वेळेचे घरपोच मोफत पौष्टीक जेवण डबा पोहच करणे. हॉस्पिटल मधील ऍडमिट आहेत व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची सोय होत नाही त्यांनाही 2 वेळेचे जेवण देऊन दिलासा देत आहे


रोज सकाळी व रात्रीचे मिळून 100 ते125 लोकांच्या जेवणाची सोय नित्यनियमाने केली जाते,तसेच हे करत लॉकडाउन काळात ड्युटी वर असलेले पोलीस बांधव याना 2 वेळा पाण्याची बॉटल पोहच करण्याची सेवा देखील चालू आहे ही सर्व कामे युवा तरुण धनंजय वाघमारे आणि मित्र परिवार चंपावती सामाजिक प्रतिष्ठाण बीडच्या माध्यमातून स्वतःहा स्वखर्चाने मदत म्हणून नव्हे तर आपले कर्तव्य समजून करत आहे,त्याच्या या कार्याने अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मोठा आधार मिळत असून त्यांचा या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *