September 20, 2021

कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला 300 कोटी द्या – धनंजय मुंडे यांची मागणी !!

कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला 300 कोटी द्या – धनंजय मुंडे यांची मागणी !!

पुणे (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील शेतकरी कोरोना आणि महागाईमुळे त्रस्त आहेत, खरीप हंगामाच्या पूर्वतयारी साठी त्यांना पतपुरवठा करण्याची आवश्यकता आहे, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यासाठी नाबार्ड कडून ३०० कोटी रुपयांची फेरकर्ज मर्यादा मंजूर करावी अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. त्यांनी बँकेच्या प्रशासकीय मंडळासह नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित उपस्थित होते.

बीड जिल्हा बँकेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी ३०० कोटी रुपये नाबार्डकडून फेरकर्ज उपलब्ध करावे या मागणीसाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुणे येथील नाबार्डच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक, सदस्य अशोक कदम, अशोक कवडे यांचेसह नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक एल.एल.रावल, रावत, व्यवस्थापक रश्मी, श्रीनिवास यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा बँकेच्या वतीने नाबार्डला फेरकर्ज मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला. बँकेची आर्थिक परिस्थिती आणि संकटकाळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. नाबार्डच्या वतीने मुख्य सरव्यवस्थापक रावल यांनी बँकेच्या प्रस्तावबाबत सत्वर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राज्य सहकारी बँकेकडून तात्काळ प्रस्ताव मागविण्यात येईल असेही सांगितले.

बीड जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जोडलेले आहेत, शासनाने बँकेला २६० कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीत शेतीची अर्थव्यवस्था कोलमडून गेल्याने आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईसारख्या संकटामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे, त्याला आधार देण्यासाठी यावर्षी उद्दिष्टांपेक्षा अधिक पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या होत्या.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *