बीड – जिल्हावासीयांसाठी शुक्रवारी प्राप्त झालेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल दिलासा देणारे होते .जिल्ह्यातील 3715 रुग्णाची तपासणी केली असता 720 पॉझिटिव्ह आढळून आले असून 2995 अहवाल निगेटिव्ह आले आहेत . केज आणि आष्टी या दोनच तालुक्यातील रुग्णसंख्या शंभर च्या वर असून इतर तालुक्यात सगळे आकडे शंभर च्या आत आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 61,आष्टी 100,बीड 48,धारूर 70,गेवराई 66,केज 102,माजलगाव 71,परळी 35,पाटोदा 71,शिरूर 76 आणि वडवणी तालुक्यात 20 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात कोरोनाचे आकडे गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहेत,मात्र शुक्रवारी जे अहवाल प्राप्त झाले ते काहीसे दिलासादायक आहेत,तरीदेखील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे .