बीड – गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या खाली आला आहे ही गुड न्यूज आहे .बीड जिल्ह्यात बुधवारी 975 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले ,विशेष म्हणजे केवळ दोनच तालुक्यातील आकडे हे शंभर ते तिनशेच्या घरात आहेत तर इतर नऊ तालुक्यातील आकडेवारी ही शंभरच्या आत असल्याने बिडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे .
बीड जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात बीड 327,आष्टी 94,पाटोदा 88,अंबाजोगाई 79,परळी 30,शिरूर 49,केज 108,धारूर 56,माजलगाव 53,वडवणी 21आणि गेवराई मध्ये 70 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा रुग्णांचा आकडा हा एक हजाराच्या आता आला आहे,त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे,मात्र तरीही नागरिकांनी आणखी काळजी घेण्याची गरज आहे.