August 20, 2022

खतांच्या किंमती कमी करा – खा मुंडेंची मागणी !

खतांच्या किंमती कमी करा – खा मुंडेंची मागणी !

बीड-खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करून बळीराजाला आधार देण्याची मागणी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केलीआहे.

खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये केलेल्या अत्याधिक दरवाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.महामारीच्या संकटात अन्नदात्या बळीराजावर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.यासंदर्भात खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांच्या किंमतींमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे.कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना खतांच्या किंमतीमध्ये झालेली दरवाढ आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.शिवाय खरीप हंगाम देखील नजीक आला असल्याने पेरणीपूर्वी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी होणे आवश्यक असल्याचे खा.प्रितम मुंडे यांनी म्हंटले आहे.केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात देखील सकारात्मक पाऊल उचलले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click