बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे,मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र एक हजाराच्या आत रुग्णसंख्या येत नसल्याचे दिसून येत आहे .मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 1186 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील 4401 रुग्णांची तपासणी केली असता 1186 पॉझिटिव्ह तर 3215 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत .बीड 284,केज 134,आष्टी 89,धारूर 60,परळी 44,शिरूर 63,अंबाजोगाई 81,माजलगाव 67 आणि गेवराई तालुक्यात 119,वडवणी मध्ये ,25 तर पाटोदा तालुक्यात 220 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात वाढत असलेले रुग्ण पाहता आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असून जिल्हाधिकारी आणि एसपी हे स्वतः रस्त्यावर उतरून लॉक डाऊन चे नियम मोडणाऱ्या विरुद्ध कारवाई करत असताना लोक मात्र विनाकारण घराबाहेर पडून कोरोना वाढवत असल्याचे चित्र आहे .