बीड – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन सख्या भावांना कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना बीड तालुक्यातील नागापूर येथे घडली .या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली गेली आहेत .
बीडपासून जवळच असलेल्या नागापूर येथील राम आणि लक्ष्मण सोळंके यांचे परमेश्वर सोळंके याच्या सोबत पंधरा वीस दिवसांपूर्वी भांडण झाले होते .या भांडणानंतर दोन दिवसांपूर्वी पुन्हा परमेश्वर याने शिवीगाळ केली होती .
याबाबत विचारण्यासाठी गेलेल्या राम आणि लक्ष्मण सोळंके या दोन भावांना परमेश्वर याने कुऱ्हाडीचे वार घालून त्यांचा खून केला .या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून उपअधीक्षक संतोष वाळके आणि बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे .