May 28, 2022

अँटिजेंन निगेटिव्ह म्हणून मृतदेह नेला गावाकडे अन पोलिसांनी केला गुन्हा दाखल !

अँटिजेंन निगेटिव्ह म्हणून मृतदेह नेला गावाकडे अन पोलिसांनी केला गुन्हा दाखल !

बीड – जिल्हा रुग्णालयात कोविड चे उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अँटिजेंन टेस्ट निगेटिव्ह आल्याने मृतदेह गावाकडे घेऊन गेलेल्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे .जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने केलेल्या चुकीची शिक्षा नातेवाईकांना का देण्यात आली असा प्रश्न आता विचारला जात आहे .जिल्हा रुग्णालयात असे प्रकार आता नित्याचेच झाले असून त्याची शिक्षा मात्र रुग्ण आणि नातेवाईकांना भोगावी लागते हे नक्की .

बीड जिल्हा रुग्णालयात सुरवसे नामक एक महिला रुग्ण दाखल झाली होती,उपचार सुरू असताना रविवारी त्या महिलेचा मृत्यू झाला,त्यावेळी नातेवाईकांनी अँटिजेंन टेस्ट करण्याचा आग्रह धरला .अँटिजेंन टेस्ट दोन वेळा केली मात्र दोन्ही वेळा निगेटिव्ह आल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने नातेवाईकांनी मृतदेह गावाकडे नेला .

त्यानंतर काही तासांनी जिल्हा रुग्णालयातुन नातेवाईकांना फोन गेला,मृतदेह घेऊन या,ते मृदेह घेऊन आले,अंत्यसंस्कार झाले अन त्यानंतर नातेवाईकांवर बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल केला गेला .

वास्तविक पाहता टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर गुन्हा दाखल कोणत्या कारणावरून केला गेला हे न उलगडणारे कोडे आहे .मृतदेहाची अँटिजेंन निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्याचा अट्टहास का केला गेला .बर अंत्यसंस्कार बीडमध्ये केल्यानंतर नातेवाईकांवर गुन्हे दाखल का केले गेले,जर चूक जिल्हा रुग्णालय प्रशासनाची असेल तर त्याची शिक्षा नातेवाईकांना का ? हे प्रश्न अनुत्तरित आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click