September 27, 2021

कोविशील्ड चा दुसरा डोस 82 दिवसांनी मिळणार !

कोविशील्ड चा दुसरा डोस 82 दिवसांनी मिळणार !

बीड – ज्या 45 वर्षावरील नागरिकांनी कोविशील्ड किंवा को वॅक्सिंन लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसऱ्या डोस साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे .कोविशील्ड घेतलेल्याना 82 ते 85 दिवसानंतर तर को वॅक्सिंन घेतलेल्याना 35 दिवसानंतर लस मिळेल .

भारतात सुरवातीला कोविशील्ड आणि को वॅक्सिंन या दोन लसी उपलब्ध झाल्या होत्या .आता रशियाची स्पुतनिक आली आहे .कोरोना पासून बचावासाठी या लसीचा उपयोग होत असल्याने लसीकरणासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे .अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याचे चित्र आहे .

दरम्यान सुरवातीला दोन्ही लसीचा 28 दिवसानंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना होत्या,नंतर कोविशील्ड साठी 45 दिवसांची मुदत वाढवली गेली .आता पुन्हा त्यात बदल करून 82 ते 85 दिवसांची मुदत केली आहे .ज्यांनी कोविशील्ड चा पहिला डोस घेतला आहे .त्यांनी आता http://ezee.live/Beed_Covid19_Registration या लिंक वर जाऊन दुसऱ्या डोस साठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे .

अनेक नागरिकांनी खाजगी रुग्णालयात पहिला डोस घेतला आहे मात्र त्यांची कुठेच नोंदणी झालेली नाही त्यांना दुसरा डोस मिळण्यासाठी अडचणी येत आहेत,याबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे .

हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर चार आकडी कोड येईल,तो कोड जपून ठेवावा,त्यानंतर 82 ते 85 दिवसानंतर आरोग्य विभागाकडून कॉल किंवा एसएमएस येईल तेव्हा लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकृष्ण पवार यांनी केले आहे .

बीडच्या चंपावती शाळेत असलेल्या लसीकरण केंद्रावर जे डॉ ढाकणे आहेत ते नागरिकांशी उद्धट पणे बोलत असल्याच्या तक्रारी आहेत .संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सौहार्दपूर्ण वागण्याच्या सूचना द्याव्यात,कारण लोकांना माहिती नसल्याने ते प्रश्न विचारतात मात्र डॉ ढाकणे सारखे लोक ओरडून,वसकून बोलत असल्याने या ठिकाणी अडचणी वाढून वाद निर्माण होत आहेत .

तसेच को वॅक्सिंन या लसीचा दुसऱ्या डोस चा कालावधी किमान 35 दिवस करण्यात आला आहे,त्यासाठी देखील रजिस्ट्रेशन आवश्यक आहे,नागरिकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करूनच लस बुक करावी ,तसेच 18 ते 44 साठी नव्याने सूचना जारी केल्या जातील .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *