बीड – बीड जिल्ह्यात कोणाचा प्रभाव गेल्या महिना दीड महिन्यात पहिल्यांदाच कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले 11 पैकी सहा सात तालुके 100 ते 200 च्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण असायचे मात्र रविवारी जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णांचा आकडा दोन महिन्यात पहिल्यांदाच हजाराच्या नव्हे तर 900 च्या हाताला बीड जिल्ह्यात 897 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून अंबाजोगाई बीड आष्टी या तालुक्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे
बीड जिल्ह्यात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरूना पॉझिटिव रुग्णांचा आकडा दीड हजार ते दोन हजार च्या घरात आढळून येत होता विशेष म्हणजे बीड अंबाजोगाई आष्टी केज परळी या तालुक्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या ही किमान दोनशे जास्तीत जास्त साडेतीनशे च्या घरात आढळून येत होती
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागामध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र होते त्यामुळे आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासनावरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला होता दरम्यान रविवारी पहिल्यांदाच 4056 रुग्णांची तपासणी केली असता तीन हजार 159 रुग्ण निगेटिव आढळून आले तर केवळ 897 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत
जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात अंबाजोगाई 97 आष्टी 119 बीड 116 धारूर 48 गेवराई 77 केज 136 माजलगाव 71 परळी 57 पाटोदा 102 शिरूर 40 आणि वडवणी मध्ये 34 रुग्ण आढळून आले आहेत गेल्या महिन्या दीड महिन्यात पहिल्यांदाच पॉझिटिव रुग्णांचा आकडा हजाराच्या आत आल्यामुळे बीड जिल्हा वासियांनी समाधान व्यक्त केले आहे