पुणे – काँग्रेसचे युवा नेतृत्व खा राजीव सातव यांचे उपचारा दरम्यान रविवारी सकाळी निधन झाले .गेल्या 26 दिवसापासून त्यांच्यावर जहाँगिर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते .सातव हे काँग्रेसमधील एक सज्जन,क्लिन इमेज आणि युवा नेतृत्व म्हणून परिचित होते .
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसांआधीच करोनावर मात केली होती. पण आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली . त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला असल्याचं सांगण्यात येत होत.
खासदार राजीव सातव यांनी करोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होतं. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आलं होतं. पण अखेर ते यातून बरे झाले. त्यांचा करोना अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देणार अशा चर्चा असतानाच त्यांची पुन्हा प्रकृती खालावली आणि रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली .
2014 साली मोदी लाटेत देखील राज्यातून निवडून आलेल्या दोन खासदार पैकी एक खासदार म्हणजे राजीव सातव होते .त्यांच्यावर गुजरात प्रभारी म्हणून देखील जबाबदारी होती .राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची विशेष मर्जी सातव यांच्यावर होती .सातव यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे .