बीड – शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात बीड जिल्ह्यात तब्बल 1150 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले .जिल्ह्यातील बीड,अंबाजोगाई, केज,आष्टी या तालुक्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून ग्रामीण भागात वाढत असलेली संख्या चिंतेचा विषय आहे .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 80,बीड 279,आष्टी 194,पाटोदा 67,परळी 38,शिरूर 92,केज 103,धारूर 69,माजलगाव 100,वडवणी 31 आणि गेवराई मध्ये 97 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असून आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .