बीड – बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा शुक्रवारी 1112 वर पोहचला,गेल्या दोन तीन दिवसात दीड हजाराच्या जवळपास असणारा कोरोना बाधितांचा आकडा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे,मात्र बीड,अंबाजोगाई या तालुक्यातील आकडे कमी होत नसल्याने चिंता देखील वाढली आहे .
बीड जिल्ह्यातील बीड 238,अंबाजोगाई 119,आष्टी 129,गेवराई 111,केज 121,माजलगाव 91,परळी 54,पाटोदा 98,शिरूर 66,वडवणी मध्ये 17 रुग्ण आढळून आले आहेत .
गेल्या दोन तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील आकडे कमी होत असल्याचे चित्र आहे,मात्र ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने ग्रामीण भागात लॉक डाऊन सह इतर नियम कडक करणे गरजेचे आहे .